सुभाष परब यांचा मासे पकडण्यासाठी गेले असताना पाण्यात पडून मृत्यु…

⚡आंबोली ता.१७-: आंबोली फौजदार वाडी येथे दुर्दैवी घटना घडली असून येथील सुभाष काशीराम परब वय ४३,फौजदार वाडी यांचा मृत्यू झाला आहे.

जवळच्या इडीची कोंड येथे मासे पकडण्यासाठी जाळे घालण्यासाठी एकटे गेले होते त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे मुलगे मुन्ना आणि मित्र हे पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्याठिकाणी चप्पल आणि शर्ट आढळून आले यानंतर शोधाशोध केली असता त्यांचा पाण्यात मृतदेह दिसून आला.ही दुर्दैवी घटना घडून त्यांचा बुडून मृत्यू झाला. पच्छात मुलगा,पत्नी,आई,भाऊ,वहिनी असा परिवार आहे.सुभाष गावडे हे सैन्यातून निवृत्त होते.सर्वात मिसळणारे आणि हसत खेळत सगळ्यात राहणारे असल्याने अचानक अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ वेक्त होत आहे.

You cannot copy content of this page