डींगणे, गाळेल, डोंगरपालसाठी कायमस्वरूपी वायरमन द्या

मनसेची वीज अभियंत्याकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.१७-: तालुक्यातील डिंगणे, गाळेल, डोंगरपाल या ठिकाणी कायम स्वरुपी वायरमन ची नेमणूक करावी अशी मागणी मनसेच्या वतीने सावंतवाडी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी यावर येत्या आठ दिवसांत तोडगा न काढल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष नाना सावंत, ग्रा. प सदस्य आदेश सावंत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page