मालवण तालुक्याचा दहावी निकाल ९९.२० टक्के

६१७ विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य

मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातून या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या १२५७ विद्यार्थ्यांपैकी १२४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६१७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. तर ४७३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १३९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर १८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळवली. तालुक्यात ३१ प्रशालांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३५ शाळां पैकी ४ शाळा मुलांच्या टक्केवारीत शंभरी गाठण्यात अयशस्वी ठरल्या. मालवण तालुक्यात अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची कु. तन्वी गणपत चौकेकर ही विद्यार्थीनी ४९६ गुण मिळवून प्रथम आली.

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचा निकाल ९७.८२ टक्के

मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला
हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. या प्रशालेतून कु. तन्वी गणपत चौकेकर ही विद्यार्थीनी ४९६ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

या प्रशालेतून १३८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल ९७. ८२ टक्के निकाल लागला आहे. या प्रशालेतील ५७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, १ विद्यार्थ्याने तृतीय श्रेणी मिळविली. या प्रशालेतून प्रथम – तन्वी गणपत चौकेकर (४९६ गुण), द्वितीय – स्नेहलता सत्यविजय तेली (४७३ गुण), तृतीय – मानसी निलेश करलकर (४६७ गुण) या गुणानूक्रमे यश संपादन केले.

भंडारी हायस्कुलमधून ओम भगत प्रथम

मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९४.१८ टक्के एवढा लागला असून. प्रशालेतील ओम मिलिंद भगत या विद्यार्थ्याने ४५७ गुण मिळवून प्रशाळेत प्रथम क्रमांक पटकावला.

भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी ए. सो. हायस्कूल मधून ८६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील २४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर ३५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि १९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली. तीन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळविली आहे. या प्रशालेतून पूर्वा शिवराम परब ही विद्यार्थीनी ४५० गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर श्रेयस प्रदिप गुळवे हा ४४८ गुण मिळवून तृतीय आला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर मुख्याध्यापक वामन खोत, संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

वराडकर हायस्कुलचा निकाल १०० टक्के

कट्टा येथील वराडकर हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- समृद्धी श्रीकृष्ण गावडे (४७६), द्वितीय- प्रतीक्षा नीलकंठ मेस्त्री (४४९), तृतीय- मयूर भवानी चौहान व मृदुला अशोक करावडे (४४७) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ऍड. एस .एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व इतर संचालक, सल्लागार कर्नल शिवानंद वराडकर, ऍड.ऋषी देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

वराडकर इंग्लिश स्कुलची मानसी सावंत प्रशालेत प्रथम

कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीय स्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- मानसी हेमंत सावंत (४२७), द्वितीय- मनीषा हेमंत आंदुर्लेक (४२६), तृतीय- गौरव राघोबा मीठबावकर (४०१) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ऍड. एस .एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक , श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व इतर संचालक
सल्लागार कर्नल शिवानंद वराडकर,ऍड.ऋषी देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

जय गणेश इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के

मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये ३० विद्यार्थी, व्दितीय श्रेणीमध्ये १४ विद्यार्थी व तृतीय श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये अनुश्री संजय वराडकर हिने ९३.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर आराध्य मंदार भिसे (९३.२० टक्के) व निनाद प्रसाद आरोदेकर (९२. ४० टक्के) यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

शिरवंडे हायस्कुलचा निकाल १०० टक्के

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेसाठी बसलेले सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये- मनस्वी गावकर (९५ %), द्वितीय- पुजा गावकर (९३.२०%), तृतीय- साथी गावकर (९२.८० %), चतुर्थ- वैभवी गावकर (९२.६०%) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष बाबु बाने, उपाध्यक्ष अच्युत भावे, कार्याध्यक्ष सतिश घाडीगावकर, सरचिटणीस तुषार राऊत, खजिनदार भाऊराव घाडीगांवकर, सरचिटणीस अशोक भावे, सरचिटणीस विजय घाडीगांवकर, अंतर्गत हिशोब तपासणीस सचिन गांवकर, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर पारकर, प्रशांत गांवकर व सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम गावकर, मुख्याध्यापक वामन तर्फे, शालेय समिती सदस्य दीपक चव्हाण, दशरथ घाडीगावकर, संतोष गावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

कुडाळकर हायस्कुलचा निकाल १०० टक्के

श्री.सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाऊंडेशन संचालित मालवण येथील डॉ.श्री.सी. कुडाळकर हायस्कुल या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सलग तिसऱ्या वर्षी या शाळेचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम – मनाली सावंत (४१३), द्वितीय- आरती पोखरणकर (४०७), तृतिय- अनुष्का म्हापणकर (४०५) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पोईप हायस्कुलचा निकाल ९८.०७ टक्के

पोईप येथील इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.०७ टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या ५२ पैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- आबाजी काशिनाथ हिवाळेकर (४४१), द्वितीय- दिशा विलास परब (४३८), तृतीय – प्रत्युष आशिष भोगले (४३४) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, संचालक, मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

खोटले हायस्कुलचा निकाल १०० टक्के

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल संचलित सौ. सुहासिनी श्रीधर परब हायस्कूल, खोटले या हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेसाठी बसलेले सर्व २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- प्रसाद एकनाथ पालव (४४९) द्वितीय – वेदिका विलास गावडे एकूण (४४७), तृतीय – योगिता प्रमोद पांचाळ (४३९) यांनी यश मिळविले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब, व विश्वस्त मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंददिपक गावडे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

वडाचापाट हायस्कुलचा निकाल १०० टक्के

भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सर्व ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- राजकुमार आनंद दुखंडे, (४७५), द्वितीय- संघमित्रा मिलिंद पवार (४५२) तृतीय- सोहम गंगाधर पालव (४५१) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विजय पाटकर, व इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

ओझर विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के

ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. सर्व २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम – आर्या प्रवीण पारकर (४६१), द्वितीय – राधिका गजानन परब (४३७) व ऋत्विक दशरथ बांदेकर (४३७), तृतीय – हर्षद राजेंद्र सुतार (४२१) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत, संस्थेचे अध्यक्ष शेखर राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस. परब, संस्था चालक तथा मालवण तालुक्याचे माजी सभापती उदय परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे यांनी अभिनंदन केले आहे.

वरसकर हायस्कुलचा निकाल १०० टक्के

वराड येथील वराड ग्रामस्थ संघ, मुंबई संचालित सौ.हि.भा.वरसकर विद्यामंदिरचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- रुपाली विठोबा करंगुटकर (४३६ गुण), द्वितीय- एकता नारायण मसुरकर (४३० गुण), तृतीय- पुंडलिक पुनाजी करलकर (४२५ गुण) यांनी यश मिळविले. सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे वराड ग्रामस्थ संघ, मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे व संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती चेअरमन आप्पासाहेब परुळेकर व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती, प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बिळवस हायस्कुलचा निकाल १०० टक्के

बिळवस येथील माध्यमिक विद्यालय बिळवस या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- सानिका श्रीराम पालव (९५.६०%), द्वितीय- सौरभ सुदर्शन परब (९२.४०%), तृतीय- सोहम नंदकुमार पाताडे (८९.४०%) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सूर्यकांत पालव, सरचिटणीस अशोक पालव, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर व पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टोपीवाला कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून. प्रशाळेतून सायली श्रीपाद नाईक ही विद्यार्थीनी ४३४ गुण मिळवून प्रथम आली आहे.

या प्रशालेमधून १९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील एक विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मध्ये आली आहे. प्रशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या प्रशाळेतून प्रथम – सायली श्रीपाद मिठबावकर (४३४ गुण), द्वितीय – श्रावणी आदिनाथ आपकर (३७१ गुण), तृतीय – निकिता निलेश शिरोडकर (३५३ गुण) यांनी गुणानूक्रमे यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. एल. बी. शिंदे तसेच संस्था चालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

काळसे हायस्कुलचा निकाल १०० टक्के

काळसे येथील श्री शिवाजी विद्यामंदिरचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम- विनीत तुकाराम प्रभू (४६५), द्वितीय- वेदिका सुधीर प्रभू (४६१), तृतीय- संस्कृती सुनील मालवणकर (४४१) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page