उंबर्डे मध्यामिकचा निकाल १०० टक्के

अमेय खाडे प्रथम

वैभववाडी प्रतिनिधी
आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डे या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत कु. अमेय अजित खाडे याने ९८.८०% टक्के गुण मिळवत वैभववाडी तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर श्रेयश श्रीकांत खाडे याने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रशालेत द्वितीय क्रमांक व पियुष दिलीप जाधव याने ९५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रशालेच्या या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रदीप दळवी तसेच सर्व संस्था कार्यकारिणी मुख्याध्यापक राठोड सर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शालेय समिती व ग्रामस्थांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page