आंबोली, ता.१७: येथील वर्षा पर्यटन संदर्भात आंबोली ग्रामपंचायत येथे पोलीस आणि प्रशासनाची नियोजन बैठक झाली. आंबोली येथे बैठकीत उपअधीक्षक डॉ.रोहिणी सोलंखे,निरीक्षक शंकर कोरे,उपनिरीक्षक अमित गोते,तहसीलदार श्रीधर पाटील,बांधकाम विभाग शाखा अभियंता विजय चव्हाण,वनक्षेत्रपाल विद्या घोडके,तलाठी शैलेश घाडीगावकर,सर्कल जी आर गुरव,बांधकाम विभाग सुपर वायझर शैलेश राणे,ग्रामविकास अधिकारी रतिलाल बहिरम,सरपंच दत्तू नार्वेकर,प्रमोद सावंत, पारपोली सरपंच,चौकुळं सरपंच सुरेश शेट्ये, गेळे सरपंच अंकुश कदम,सदस्य काशीराम राऊत,महेश पावसकर,स्वप्नीता कर्पे,हवालदार दत्ता देसाई,पोलीस एच एल चौधरी, पर्यटन व्यावसायिक रूपा गावडे,विलास गावडे,आनंद गावडे,अनंत पडते,हेमंत ओगले, अमरेश गावडे,सचिन नार्वेकर,वामन पालेकर,प्रकाश गावडे,एकनाथ पारधी,पांडुरंग गावडे,सिद्धेश भिसे,निर्णय राऊत,अरुण गावडे,प्रकाश लाड,उल्हास गावडे,रोहित गावडे,पत्रकार विजय राऊत,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. आंबोलीत शनिवार रविवार १२० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.आंबोलीत चौकुळ रस्ता महादेवगड रस्ता तसेच पार्किंग असणाऱ्या ठिकाणी सर्व गाड्या पार्किंग करून धबधब्याकडे पाठवण्यात येणार आहे.आंबोलीतील रिक्षा तसेच परमिट असणाऱ्या खाजगी गाड्या यासाठी दर ठरवून असणार आहेत.वाहतूक पोलीस यांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे.वीज वितरण ला कर्मचारी ज्यादा देण्यासाठी सूचना करण्यात येणार आहे.पोलिसांचे पेट्रोलिंग असणार आहे.धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होईल.एक नंबर देण्यात येणार असून धिंगाणा किंवा अनुचित प्रकाराबाबत फोन केल्यास तत्काळ पोलीस येणार आहेत.काही ठिकाणी सुरक्षा साठी रेलिंग ची दुरुस्थी करण्यात येणार आहे.आंबोली चौकुळ आणि पारपोली या तीनही गावांची संयुक्त १० रुपये करवसुली करण्यात येणार आहे. यावेळी बांधकाम विभाग शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी घाटातून १० चाकी अवजड गाड्यांना पावसाळ्यात परवानगी आहे.मात्र अति अवजड गाड्या देखील जातात असे सांगितले. आंबोली वर्षा पर्यटन नियोजन बैठकीत याबाबत चर्चा झाली.
वर्षा पर्यटन संदर्भात आंबोली ग्रामपंचायत येथे पोलिस आणि प्रशासनाची नियोजन बैठक संपन्न…
