लावण्या रेडकर प्रशालेत प्रथम
⚡सावंतवाडी ता.१७-: तळवडे येथील श्री जनता विद्यालय तळवडेचा एसएससीचा निकाल शंभर टक्के लागला असून लावण्या प्रमोद रेडकर हिने (९२.२० टक्के) गुण मिळवून प्रशालेतून पहिला येण्याचा मान मिळविला.
सानिका सीताराम गावडे (९० टक्के) गुणांसह द्वितीय तर यशश्री दीपक कोरगावकर (८७.४० टक्के) गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्यातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
