⚡सावंतवाडी ता.१७-: श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
यात कु. स्नेहल रविंद्र गावडे ही विद्यार्थीनी 87.60 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली कु. अपर्णा शशिकांत गवंडे ही 85.20 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी व प्रिया दशरथ गावकर ही विद्यार्थीनी 84.20 टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरी आली आहे.
