⚡कणकवली ता.१७-: राज्य शिक्षण परीक्षा मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत नॅशनल इंग्लीश मिडियम स्कूल नडगिवेचा निकाल 100% लागला असून कु.फिझा मुल्ला हिने 97.40% गुण मिळवून शाळेत व केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला असून कु.पार्थ उन्हाळकर 95%, कु. शिरीष मोरे 92%, कु. झरीन पटेल 88.20%,कु.कृष्णा पटेल 86.80%,कु. फैसल काझी 85%, कु.रिद्धी धुमाळ 82.60% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली आहे. शाळेच्या या ऐतिहासिक निकालाचे प्रशालेत फटाक्यांच्या अतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
आपल्या जीवनात काही गोष्टींची नोंद इतिहासात व्हावी अशा अनेक संधी आपल्याला मिळत असतात परंतु काही संधी मात्र जीवनात एकदाच येतात काही संधी पहिली व शेवटची असते अशीच संधी जी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असणाऱ्या संधीमधील एक संधी म्हणजे 10 वी आणि या वर्गात भरघोस गुण मिळविणे. ही संधी जीवनात एकदाच मिळते आणि विशेष म्हणजे हा इतिहास आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरगोस गुण मिळवून नोंदविला आहे त्याचा आम्हा सर्वांना खूप मोठा आनंद झाला आहे या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे आम्ही अभिनंदन करतो व या पुढे जीवनात येणाऱ्या सर्व आव्हानात ते घवघवीत यश संपादन करोत असे प्रतिपादन विशेष कार्यकारी अधिकारीराजेंद्र भोरे यांनी केले .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर , विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
