Headlines

आरोंदा हायस्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के

⚡सावंतवाडी ता.१७-: आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल आरोंद्याचा (अनुदानित) एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रशालेतून एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यात प्रथम चैतन्य विलास जोशी (९२%) ,द्वितीय दिव्या दर्शन जोशी (८६.६०%) तर तृतीय वामन सुधीर गावडे व अदिती शिवराम पालव (८४.४०%,) यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव नाईक, संस्था सचिव भाई उर्फ वासुदेव देऊलकर, संस्था पदाधिकारी, शालेय समिती, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांच्यावतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page