*राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला नाही आला

*आमदार नितेश राणे यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

*💫कणकवली दि.१८-:* सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रा पं.च्या निवडणुकांत भाजपाला बहुमत मिळाले आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी विधेयकाना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय ना येणार असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना दिला. ग्रा.पं. निवडणूक निकालानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचे कणकवली भाजपा कार्यालयाकडे जल्लोशी स्वागत भाजपा कार्यकर्त्यांनी केले. आमदार नितेश राणे यांनी ग्रा.पं निवडणूकित मिळालेले यश हे मोदी सरकारच्या योजनांचे फलित असल्याचे सांगितले. देवगड तालुक्यात २३ पैकी १७ जागांवर वैभववाडी त १२ पैकी ९ ग्रा पं वर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तोंडवली बावशीत २५ वर्षानंतर भाजपाची सत्ता आली आहे. भिरवंडे गावात ५० च्या आत असणारी भाजपाची मते २०० हुन जास्त झाली. भिरवंडेत शिवसेनेचा नैतिक पराभव झाला असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जिल्ह्यात ७० पैकी ५५ ग्रा.पं. मध्ये भाजपला विजय मिळाला आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी विधेयकाचा आहे. ग्रामीण भागातील जनता कृषी विधेयकाच्या बाजूने असल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचेही आमदार राणे म्हणाले.

You cannot copy content of this page