मालवण तालुक्यात ६ पैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

मालवण दि प्रतिनिधी दोन दिवसापूर्वी झालेल्या मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाच ठिकाणी पराभव झाल्याने शिवसेनेला नामुष्की पत्करावी लागली असून या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने कुणकावळे, मसदे चुनवरे, चिंदर,गोळवण,पेंडूर खरारे या ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे शिवसेनेला केवळ आडवली – मालडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मालवण तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे शिवसेनेला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या गोटात सन्नाटा होता तर भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला. सहा ग्रामपंचायतींच्या एकूण ५४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यातील कुणकवळे व आडवली मालडीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाला. त्यामुळे ५० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ३६ तर शिवसेना पुरस्कृत १८ जागांवर यश मिळाले. तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता तहसीलदार अजय पाटणे, सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. *आडवली-मालडी :* प्रभाग एक – सुनील जाधव (१७१), सोनाली पराडकर (१७६), भक्ती साटम (१४५), प्रभाग दोन – संदीप आडवलकर (१२५), दामिनी घाडीगावकर (१२४), प्रभाग तीन – ज्योती लाड, स्वप्नील लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. *कुणकवळे* – प्रभाग एक – शुभांगी मेस्त्री, श्रेया दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरेश राणे (११०), प्रभाग दोन – कार्तिकी निकम (५०), जयवंत तेली (५५), प्रभाग तीन – मंदार वराडकर (७१), देवयानी कदम (७५). *खरारे पेंडूर* – प्रभाग एक – अश्विनी पेडणेकर (३०६), शैलेश परब (१९४), सुनीता मोरजकर (२१७), प्रभाग दोन – कृष्णा मांडकुलकर (२४९), समृद्धी सरमळकर (३०४), नेहा परब (३३०). प्रभाग तीन – सुमित सावंत (१९१), अंकिता सावंत (२११), प्रभाग चार – विवेक जबडे (२७७), संदीप सावंत (२९२), वैष्णवी लाड (३७१). *गोळवण-कुमामे-डिकवल* – प्रभाग एक – शरद मांजरेकर (२९०), एकादशी गावडे (३१७), सुभाष लाड(२३८), प्रभाग दोन- प्राजक्ता चिरमुले (२६३), मेघा गावडे (२३२), साबाजी गावडे (२२७), प्रभाग तीन – विरेश पवार (२३९), शिल्पा तेली (२२३), विभा परब (२६३). *चिंदर* – प्रभाग एक – केदार परुळेकर (३१५), रिया घागरे (२७८, चिठ्ठीद्वारे विजयी), दीपक सुर्वे (३०४), प्रभाग दोन – राजश्री कोदे (२८०), सानिका चिंदरकर (२३९), शशिकांत नाटेकर (२१५), प्रभाग तीन – दुर्वा पडवळ (२०७), महेंद्र मांजरेकर (१८४), प्रभाग चार – नम्रता महांकाळ (२९९), जान्हवी घाडी (२८४), निलेश रेवडेकर (२३९). *मसदे-चुनवरे* – प्रभाग एक – ऋतुजा नार्वेकर (१२९), केतकी प्रभू (१४५), अंकुश नेरूरकर (१५१), प्रभाग दोन – धनश्री कांदळकर (१७३), शमिका वाडकर (१७९), कलाधर कुशे (१६३), प्रभाग तीन – अनिल जाधव (१५९), रामदास पांजरी (१४५), श्रेया परब (१४६).

You cannot copy content of this page