माजी सरपंच जयदेव परब यांचे निधन

⚡वेंगुर्ला ता.१४-: तुळस-देऊळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच जयदेव भाई परब (६२) यांचे दि.१३ जून रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, जावई, भाऊ, भावजय पुतणे, दोन बहिणी, भाओजी, भाचे, भाच्या असा परीवार आहे.

  अलिकडची काही वर्षे वगळता त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवला होता. आजच्या तरुण पिढीला ते उत्तम असे मार्गदर्शक होते. तुळस व तळवडे येथे वैद्यकीय सेवा देणा-या डॉ.रमा परब यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने तुळस बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
You cannot copy content of this page