⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुक्यात आज ठिकठिकाणी वटपौर्णिमा सण महिलांनी उत्साहात साजरा केला. काहींनी वडाच्या झाडाकडे एकत्र येत तर काहींनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. यावर्षी पाऊस नसल्याने महिलांचा आनंद ओसंडून वहात होता.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा‘ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना एकत्र येऊन मनाजोगता सण साजरा करता आला नव्हता. यावर्षी मात्र, कोरोनााचे संकट नसल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणात वटवृक्षाकडे गर्दी करीत हा वडाचे पूजन केले.
