⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन कार्याबद्दल डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचा पाच लाखांचा पुरस्कारा मिळाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचतर्फे प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डाूॅ.बी.एन सावंत, त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ विजयकुमार देसाई व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला तालुका आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचची बैठक मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली फळ संशोधन केंद्रात संपन्न झाली. यावेळी अॅड.प्रकाश बोवलेकर, श्यामसुंदर राय, राजेश परब, किशोर नरसुले, हनुमंत आंगचेकर, अनंत प्रभू, रतन धूरी, शास्त्रज्ञ अजय मुंज यांनी चर्चेत भाग घेतला. आंबा, काजू बागायतदार संघ रजिस्टर झाल्यानंतर बागायतदारांचा मोठा मेळावा घेण्याचे ठरले.
