वेंगुर्ल्यात रविवारी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील जलतरण तलाव येथे रविवार दि. ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १०, १४ व १७ वर्षाखालील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. तसेच ६० वर्षावरील खुला गट तर वेंगुर्ल्यातील आठ वर्षाखालील मुलामुलींसाठी विशेष गट ठेवण्यात आला आहे.

ही स्पर्धा २५ व मीटर फ्रीस्टाईल प्रकारात घेण्यात येणार असून १०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र तर सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. नावनोंदणीसाठी जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत (७२४९२०२६९१) यांच्याशी संफ साधावा.

You cannot copy content of this page