मालवण ता.०३-:* मालवण तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले असून याबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालवण तालुका भाजपा कडून मालवण तहसील प्रशासनाला देण्यात आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथील संजय गांधी योजना शाखा येथील अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले आहे.
यावेळी भाजपचे विजय केनवडेकर, दीपक पाटकर, भाऊ सामंत, गणेश कुशे, महेश मांजरेकर, निलेश खोत, आबा हडकर, बबलू राऊत, प्रमोद करलकर, पूजा करलकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तसेच श्रावण बाळ अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यापासून रखडले आहे.
यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी लाभार्थ्यांना शासनाकडून तात्काळ अनुदान प्राप्त व्हावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून मालवण तहसील प्रशासनास देण्यात आला आहे.
