वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन…

भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांचा विज अधिकाऱ्यांना इशारा…

वैभववाडी प्रतिनिधी भुईबावडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर ३.जून रोजी भुईबावडा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नळ योजना मोटारपंप वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्याची गैरसोय होत आहे. तसेच इलेक्ट्रिक उपकरणे नादुरुस्त होत आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. तरी वीज पुरवठा नियमित सुरळीत सुरू करण्यात यावा. ग्रामपंचायत हद्दीतील वीज खांबावर आलेली झाडी तोडून वीज पुरवठा सुरळीत करावा.

अन्यथा येत्या ३ जूनला भुईबावडा ग्रामस्थ आंदोलन छेडतील असा इशारा सरपंच मोरे यांनी दिला आहे. फोटो- भुईबावडा येथील कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देऊन चर्चा करताना सरपंच बाजीराव मोरे व इतर छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page