महेंद्र कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

वैभववाडी प्रतिनिधी वेंगसर बौध्दवाडी येथील महेंद्र यशवंत कांबळे वय ४५ यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.वेंगसर गावातील सुप्रसिद्ध कव्वाली गायक यशवंत वेंगसर यांचे चिरंजीव होत. मुंबई महानगर पालिकेत सेवेत होते. मुंबई आग्रीपाडा विभागात वंचित बहुजन आघाडीचे विभाग प्रमुख म्हणून काम करत होते.

डाॕ.प्रकाश आंबेडकर यांच्या जवळचा विश्वासू कार्यकर्ता होता. कामगार संघटनेतही ते सक्रीय होते.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page