अन्यथा घनकचरा व्यवस्थापन कर लागू करू नका…

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड (प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन कर लावण्यासंदर्भात नगर विकास विषयाकडे अधिसूचनेची च्या आधारे लावण्याचे ठरविले आहे व तशी प्रसिद्धी दिली आहे पण या घनकचरा व्यवस्थापन करायला आपला विरोध असून नागरिकांना आवश्यकता व्यवस्था नगरपंचायत २०२२/२०२३ या आर्थिक वर्षात देत आहेत का? आणि देत नसेल तर हा तर तो पर्यंत हा कर लागू करु नका अशी मागणी नगरसेविक तन्वी चांदोस्कर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे नगरपंचायतीचे घंटागाडी १००%(चालू आहेत का? घराचा कचरा घेत आहे का? नगरपंचायतीच्या हद्दीत ओला व सुका कचरा किंवा धोकादायक कचरा इत्यादी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे का? त्याचवेळी नगरपंचायतीचा एफएसटीपी प्लॅन्ट चालू आहे का? नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये १७ प्रभागांच्या सद्यस्थिती योग्य ती स्वच्छता होत आहे का? नगरपंचायत मार्फत ओला कचरा घेतला जात आहे त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे का? या बरोबरच नगर पंचायतीमार्फत मच्छर व इतर साथीच्या रोगावर फार्मिंग व फवारणी होत आहे का ?या सर्व मुद्द्यानुसार२०२२/२३ या आर्थिक वर्षात मुख्याधिकारी यांनी आपल्या स्तरावर या सर्व व्यवस्था होत असतील तर लेखी निवेदनाचे लेखी उत्तर आपणास द्यावे व नगरपंचायतीने आरोग्य कर घ्यावा घ्यावा की कचरा व्यवस्थापन कर घ्यावा यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायत एक विशेष सभा आयोजित करावी व तोपर्यंत कचरा व्यवस्थापन कर नगरपंचायतीने घेऊ नये कारण एकाच व्यवस्थेखाली नागरिकांना दोन दोन कर वसूल करेल ते आपल्याला मान्य नाही. तरी या व योग्य तो निर्णय घ्यावा .अशी मागणीही नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page