ठाकर समाज कणकवली संघटनेची २८ मे रोजी अशियेमठ येथे सभा

कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग तालुका शाखा – कणकवली या संघटनेची कणकवली तालुक्यातील सर्व समाज बांधवांची सभा शनिवार २८ मे २०२२रोजी सकाळी १०.३० वाजता अशियेमठ, समाज मंदीर येथे आयोजीत करण्यात आली आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या सभेस वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वैभव ठाकुर, जिल्हा कार्याध्यक्ष निलेश ठाकुर, नामदेव ठाकर यांनी केले आहे.

सदर सभेला जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.सभा कोरम अभावी तहकुब झाल्यास सदर सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने म्हणजेच ठीक ११.०० वाजता चालु करण्यात येईल त्यास कोरमची आवश्यकता असणार नाही याची सर्व कार्यकारणी सदस्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page