आंबा चोरी प्रकरणातील संशयीत आरोपींना जामिन मंजूर

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* उभादांडा-वरचेमाडवाडी येथील प्रशांत शिवलकर यांच्याकडे करारास असलेल्या आंब्याच्या बागेतील आंबे चोरल्या प्रकरणातील संशयीत आरोपी गौतम कैलास वेंगुर्लेकर, प्रविण चंद्रकांत कोटेकर व प्रितेश रोहिदास मसुरकर यांची वेंगुर्ला न्यायालय पदभार कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश ए.जे.बचुलकर यनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सर्शत जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले.

दि.८/५/२०२२ व दि.९/५/२०२२ रोजी वरचेमाडवाडी येथील प्रशांत शिवलकर यांच्याकडे करारास असलेल्या आंब्याच्या बागेमधील सुमारे १५ क्रेट भरतील एवढे ४५ हजार किमतीचे आंबे संशयीत आरोपी गौतम कैलास वेंगुर्लेकर, प्रविण चंद्रकांत कोटेकर व प्रितेश रोहिदास मसुरकर यांनी चोरल्याच्या संशयावरुन सदर आंब्याच्या बागेमध्ये काम करणा-या रावसाहेब शेलार याने वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये १७ मे रजी तक्रार दिली होती. त्यानुसार संशयीतांविरोधात वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा निर्माण झाला होता. संशयीतांना वेंगुर्ला न्यायालय पदभार कुडाळ न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयच्या सर्शत जामिनावर मुक्तता केली. तसेच आरोपी यांनी तपासकामात पोलिसांना सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न टाकणे, साक्षीदार न फोडणे, आपल्या जवळच्या दोन नातेवाईकांचे पत्ते व मोबाईल नंबर देण्याच्या अटीवर जामिन मंजूर करण्यात आला.

You cannot copy content of this page