तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट उलटली

उपचारासाठी आठ जण रुग्णालयात दाखल

*⚡मालवण ता.२४-:* देश विदेशात पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेल्या तारकर्ली च्या समुद्रात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कुबा डायविंग ची बोट समुद्रात पलटी झाली या बोटीतील सर्व पर्यटक समुद्राच्या पाण्यात कोसळले. सुदैवाने बुडणाऱ्या या पर्यटकांना समुद्र किनारी आणण्यास आले असले तरी आठ जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे आहे. यात उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे मालवणसह जिल्ह्याची किनारपट्टी हादरून गेली आहे.

You cannot copy content of this page