सावंतवाडी ता.२३-:* कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८/०५/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सचिव भरत गावडे यांनी केले आहे. *सभेपुढील विषय-* १) मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन व मंजुरी. २) सन २०२२-२०२३ साठी सनदी लेखापाल यांच्या नियुक्तीस मंजुरी देणे. ३) पुढील तीन वर्षासाठी नुतन कार्यकारी मंडळातील पदाधिकारी, सदस्य व समिती प्रमुख यांच्या नियुक्त्यांना मान्यता देणे. ४) पुढील वर्षातील प्रस्तावित कार्यक्रमांना (जिल्हा साहित्य सम्मेलन, जिल्हा महिला साहित्य सम्मेलन, बाल साहित्य सम्मेलन व इतर कार्यक्रम) मंजुरी घेणे. ५) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे.
