सत्यवान रेडकर यांचा सुनिर्मल समाजगौरव पुरस्काराने सत्कार

*⚡सावंतवाडी ता.२३-:* ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबवणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कोकणचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांच्या शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेत सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईतर्फे मुख्य अतिथी जगन्नाथराव हेगडे (माजी नगरपाल मुंबई), सुकृत खांडेकर (संपादक, दैनिक प्रहार) व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गणेश विद्या मंदिर हायस्कूल, धारावी येथे सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कोकणच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ओळखून त्याची विशेष दखल घेत मुंबई येथील सामाजिक संघटनेने पुरस्कार प्रदान करणे ही एक विशेष बाब आहे.

You cannot copy content of this page