कोरोना लसीकरणास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रारंभ

*💫सावंतवाडी दि.१६-:* उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाची पहीली लस डॉ. पांडुरंग वजराटकर यांना देण्यात आली आहे. परीचारीका शुभांगी देऊलकर यांनी हा डोस दिला आहे. तसेच परीचारीका आरेकर यांनी कर्मचाऱ्यांमधून पहीला डोस घेतला आहे.‌ यावेळी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक, मुख्याधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, वर्षा शिरोडकर, गटविकास अधिकारी एम. व्ही.नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी १०० लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी संपुर्ण टीम सज्ज झालीय अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी दिली आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजित चितारी, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांसह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका आदी उपस्थित होते.‌

You cannot copy content of this page