नागरी सुविधा सहाय्य योजनेअंतर्गत देवगड नगरपंचायतिला विकास कामांसाठी १ कोटी १०लाख मंजूर…

*देवगड ता.२१-: नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागरी सुविधा सहाय्य योजने अंतर्गत विकास कामांकरिता देवगड जामसंडे नगरपंचायतिला १कोटी १० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

यात प्रमुख्याने१) देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २ मधील जामसंडे लाड यांच्या वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे नूतनीकरण करणे.( वीस मीटर) अंदाजित रक्कम रुपये २० लाख, २) देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक ७ मधील जामसंडे मळई उताराचा रस्ता ते मळई मशीद पर्यंत रस्ता खडीकरण करणे,( ४० लाख )रुपये प्रभाग क्रमांक ८ मधील नलावडे कॉम्प्लेक्स येथील रसाळ घर ते टेलीफोन ऑफिस पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, (२० लाख) नगर प्रभाग क्रमांक २ मधील दिर्बादेवी मंदिर ते पांडुरंग घाडी रस्त्यामधील पुलाचे नूतनीकरण करणे ,अंदाजित रक्कम( रुपये ३० लाख )असा एकूण१ कोटी १० लाख रुपयांचा निधी शासन निकषानुसार मंजूर करण्यात आला आहे .

रत्नागिरी जिल्ह्याचे खास. विनायक राऊत यांच्या यांच्या विशेष प्रयत्नाने या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिवसेना उपतालुका प्रमुख नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page