साहेब क्लासेस आयोजित उन्हाळी शिबिर यशस्वीपणे संपन्न…

शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी ता.२१-:* कोरोना महामारीनंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी साहेब क्लासेस सावंतवाडी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबीरास मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दर्शवला ‘लर्न विथ फन’ या थीम च्या आधारे या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले साहेब क्लासेसचे संचालक अनिरुध्द जुवेकर यांच्या मार्गदर्शनाने हे उन्हाळी शिबीर यशस्वी पणे पार पडले अनेक वर्षांपासून साहेब क्लासेस उन्हाळी शिबीर राबवीत आहेत यावर्षी ‘लर्न विथ फन’ या थीम च्या आधारे त्यांनी मुलांसाठी विविध उपक्रम राबविले या उपक्रमांमधून मजेशीर पद्धतीने नवीन कौशल्य शिकणे ही मुलांसाठी पर्वणीच होती मुलांना संभाषण कौशल्य, संगणक कौशल्य, इंग्लीश स्पीकिंग याबाबतचे मार्गदर्शन उमाली मॅडम निकिता मॅडम आणि भक्ती मॅडम यांनी केले.

डॉ. संगीता तुपकर यांनी योग अभ्यास घेत मुलांमध्ये आरोग्य विषयक गोडी निर्माण केली संदेश गोसावी यांच्याद्वारे घेतलेल्या स्टारगेझींग या उपक्रमातुन मुलांना अवकाशाची सफर घडुन आली श्री पोलाजी यांनी चित्रकलेतील सोप्या सरळ रचना दाखवत चित्रकलेविषयी मुलांमध्ये आवड निर्माण केली मुलांच्या बुद्धिला चालना मिळण्यासाठी तेजराज रेमुळकर यांच्याद्वारे आयोजित बुद्धिबळ मध्ये बुद्धिबळाविषयक माहिती देउन मुलभुत गोष्टी शिकवण्यात आल्या.

अनिरुध्द जुवेकर यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले तसेच या मुलांना आपल्या ध्येयनिश्चितीसाठी आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल याविषयक माहिती दिली या १२ दिवसनंतर या शिबिराचा समारोप करण्यात आला शिबिराच्या समारोप समारंभाच्या दिवशी शिवाजी पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना समर कॅम्प सहभागी प्रमाणपत्र देऊन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page