शिक्षणासाठी केला खडतर प्रवास;तेजलचे होत आहे अभिनंदन
दोडामार्ग ता.२०-:* दोडामार्ग तालुक्यातील दूर्गम डोंगराळ भागात वसलेला गाव मांगेली येथे शिक्षणाची फारशी सुविधा नाही अशा ग्रामिण भागात जन्म घेतलेल्या शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाऊन वैद्यकिय शिक्षण घेतलेली मांगेली गावातील कु.तेजल विजय गवस हिने एम.बी.बी एस होऊन डाॅक्टर बनली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वञ कौतुक होताहे.माजी सरपंच विजय गवस यांची ती कन्या आहे.
मांगेली सारख्या ग्रामिण भागातील मुलगी डाॅक्टर होणे ही पहिली वेळ आहे.मांगेली गावातील इतर मुली देखील चांगले शिक्षण घेऊन ग्रामसेवक तसेच इतर क्षेञात देखील आहेत.काही शिक्षक देखील आहेत. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळवाडी येथील तेजल विजय गवस हिने एमबीबीएस परीक्षेत 63.2 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे .या तिच्या यशा बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होते आहे .
