पिकुळा तीठा ते उसप खोक्रल रस्त्याचे काम अर्धवट

उसप सरपंच दिनेश नाईक यांचा आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग ता.२०-:* सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पिकुळा तिठा ते उसप खोक्रल रस्त्यावर असलेल्या नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुल बांधकाम केले पण जोड रस्ता तयार करण्यासाठी खडी टाकली पण पावसाळा सुरु झाला तरी संबधित ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही.जो पर्यायी रस्ता तयार केला तो पावसामुळे धोकादायक बनला आहे.

गाड्या रूतत आहेत. खड्डे पडले आहेत.आठ दिवसांत रस्ता काम पूर्ण केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा उसप सरपंच दिनेश नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page