लक्ष्मीनारायण वर्धापनदिन २२ रोजी

वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला, खांबड-भटवाडी येथील श्री देव लक्ष्मीनारायणाचा वार्षिक वर्धापनदिन रविवार दि. २२ मे रोजी भक्तिभावाने संपन्न होत आहे.

यानिमित्त सकाळी लक्ष्मीनारायणाची पूजा, १० वा. श्रीसत्यनारायण महापूजा, रात्रौ ७.३० वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थप्रसाद व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन श्री देव लक्ष्मीनारायण कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page