पूर्वस देवाचा वाढदिवस २२ मे रोजी

वेंगुर्ला ता.२०-:* प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील श्री देव पूर्वस देवाचा वर्धापनदिन रविवार दि. २२ मे २०२२ रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी लघुरुद्र व अभिषेक, त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, दुपार १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव पूर्वस देवस्थानतर्फे केले आहे.

You cannot copy content of this page