आमदार केसरकरानी शहर विकासात खो घातल्यास गप्प बसणार नाही..

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा;’ते’ रस्ते आमच्या कारकीर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर

सावंतवाडी ता.१८-:* शहरातील विकास कामामध्ये आमदार दिपक केसरकर कुठे खो घालण्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान बाहेरच्यावाड्यतील रस्ते हे केंद्रीय मंत्री नारायण यांच्या नगरोथ्यानच्या माध्यमातून आमच्या कारकीर्दीत मंजूर झाले आहेत. त्यामुळे केसरकर आता पत्रक छापून हे रस्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून केल्याचा दावा करत आहे. आमदार केसरकर हे आता फुक्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप देखील संजू परब यांनी आज येथे केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान बबन साळगावकर हे नगराध्यक्ष असताना त्यांना तब्बल सात वर्षे पालिकेची पायरी का चढू दिली नाही, याचे कारण आत्ता आम्हाला कळले, असा टोला ही परब यांनी लगावला तसेच त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर टिका केली.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक नासीर शेख,दिपाली भालेकर उत्कर्षा सासोलकर आनंद नेवगी,राजू बेग,अजय सावंत,बंटी पुरोहित,बंटी जामदार,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, ते रस्ते आमच्या कारकीर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाले असताना आमदार दीपक केसरकर यांनी पत्रक छापून महाविकास आघाडी व मुख्याधिकारी यांचे नाव टाकून कसे काय व्हायरल केले. याचा खुलासा मुख्याधिकारी यांनी करावा. अन्यथा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करू असा इशारा संजू परब यांनी दिला आहे. ते रस्ते आता होत असल्याने आमदार केसरकर हे फुक्याचे श्रेय घेत आहेत. यापूर्वी त्यांनी शहरातील विकास कामांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी असे प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही. असा इशारा देताना त्यांनी जरी ते रस्ते आपणच केले असल्याचा दावा केला तरी देखील आगामी पालिका निवडणुकीत आमचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page