मालवण ता.१७-:* मालवण येथील भंडारी हायस्कूल सोसायटीज मालवणच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारी हायस्कूल मालवणच्या १९७१-७२ च्या सुवर्णमहोत्सवी एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विभागस्तरीय टेबल-टेनिस स्पर्धेमध्ये गोव्यातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. गेले दोन दिवस भंडारी हायस्कूल मालवण येथे या भव्य टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारी हायस्कूल मालवणच्या १९७१-७२ च्या सुवर्णमहोत्सवी एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विभागस्तरीय टेबल-टेनिस स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- ११ वर्षांखालील गट मुली : प्रथम- इशिता कोलॅसो,द्वितीय- अवनी माने, तृतीय- तन्वी चव्हाण. १३ वर्षां खालील गट मुली : प्रथम- इशिता कोलॅसो, द्वितीय- तन्वी चव्हाण, तृतीय- आर्या दिघे,वर्षा परुळेकर. १५ वर्षांखालील गट मुली : प्रथम- इशिता कोलॅसो,द्वितीय- निहाली पाटील, तृतीय- काव्या शेजवाल,तन्वी चव्हाण. १७ वर्षांखालील गट मुली : प्रथम- निहाली पाटील,द्वितीय- सायली माजगावकर, तृतीय- अनुश्री नाईक,हिमानी येरम. ११ वर्षाखालील गट मुलगे : प्रथम- चंदन कारे,द्वितीय- चिन्मय भाकरे तृतीय- ओझिल कार्डो, युग प्रभू. १३ वर्षांखालील गट मुलगे : प्रथम- म्रित्येय कलमकर,द्वितीय- अथर्व धुळपकर तृतीय- संकल्प बांदिवडेकर, चंदन कारे. १५ वर्षां खालील गट मुलगे : प्रथम- केतन सुतार, द्वितीय- वेदांत पाटील, तृतीय- म्रित्येय कलमकर, ईशान माने. १७ वर्षांखालील गट मुलगे : प्रथम- यश पाटील द्वितीय- म्रित्येय कलमकर, तृतीय- कारे, देव भाकरे, पुरुष दुहेरी: प्रथम अरुण नाईक, अमित नाईक, द्वितीय: रत्नदीप शिवानी, दिलजीत वेलिंगकर, तृतीय: शॉन सोराईस,निखिल बांदेकर,जैनम शहा नवीन शहा. ६० वर्षांवरील पुरुष गट: प्रथम अरुण नाईक द्वितीय विष्णू कोरगावकर तृतीय विनय प्रभुझांट्ये, दिलीप हुनारी. महिला एकेरी खुला गट: प्रथम- पृथा पर्रीकर द्वितीय- अनुश्री नाईक, तृतीय- तृषा हम्मनवार, अनुष्का हम्मनवार. पुरुष एकेरी खुला गट: प्रथम- दिलजीत वेलिंगकर, द्वितीय-अद्वैत बोंद्रे,तृतीय- विवेक कुंभार,रजत तोरसकर.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा समितीचे अध्यक्ष अरुण भोगले, सचिव मुकुंद काजरेकर, खजिनदार उल्हास पराडकर, सदस्य अनिल मुंडये, राजू अंधारी,चंद्रकांत गिरकर, चंद्रकांत रेवडकर, उत्तम पाटील, सेवानिवृत्त आय.टी. अधिकारी शशांक घुर्ये, भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर किरण पिंगुळकर, मुख्याध्यापक वामन खोत, महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे खजिनदार नितीन तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सर्व खेळाडू, त्यांचे पालक आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे सुयोग्य व्यवस्थापन भक्ती मेस्त्री आणि किरण पिंगुळकर यांनी केले.
या स्पर्धेच्या नियोजनासाठी ‘मालवण टेबल टेनिस अकॅडमी’चे अध्यक्ष विष्णू कोरगावकर आणि त्यांच्या अकॅडमीचे सर्व खेळाडू, तसेच त्यांचे सहकारी लक्ष्मण उर्फ पिंटू मेस्त्री, सुजन परब, चंद्रकांत साळवे, विवेक कोरगावकर, मंदार केळकर यांनी खूप मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून साईशा उस्कैकर, खुशी पेटे, पावनी मालणकर, आयुष तपकिरकर, ईशांत वेंगुर्लेकर, ऋषिकेश गवस, दिग्गज जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनामध्ये ‘महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग’ या संस्थेचे सहकार्य लाभले.
भंडारी हायस्कूलच्या १९७१-७२ च्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय भव्य टेबल टेनिस स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करून समाजापुढे एक आदर्शवत पायंडा पाडल्याबद्दल भंडारी हायस्कूल सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
