आनंदव्हाळ येथे पर्यटकांच्या दोन गाड्यांमध्ये अपघात

मालवण ता.१७-:* मालवण कसाल या मुख्य मार्गावरील आनंदव्हाळ येथील अवघड वळणावर पर्यटकांच्या इनोव्हा आणि एर्टिगा या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर धडक होऊन आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक येथील पर्यटक आपल्या इनोव्हा गाडीमधून (क्र. MH-15 -CM-5314) मालवणात पर्यटनासाठी येत होते. तर एर्टीगा (क्र. MH-48-BH-8917) या गाडीतून पर्यटक मालवणहून कसालच्या दिशेने जात होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील वळणावर या दोन्ही गाड्या समोरासमोर येऊन त्यांच्यात जोरदार धडक बसली. यात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती कळताच मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजूर्णे, पोलीस सुभाष शिवगण, प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला.

You cannot copy content of this page