सांगली येथे आयोजित करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्पर्धा..
सावंतवाडी ता.१७-:* सांगली येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अॅकेडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर आणि रॅपिड स्पर्धेत राजेश विरनोडकर या दोघांनी पारीतोषिके मिळवली.बाळकृष्ण याने सहा दिवस घेण्यात आलेल्या 53 व्या कै.श्री.बाबुकाका शिरगावकर क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत रेटींग कॅटेगरीत तिसरा क्रमांक मिळवला.तर दोन दिवस घेण्यात आलेल्या रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर याने एकोणीस वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला आणि राजेश विरनोडकर याने सोळा वर्षे वयोगटात दुसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातील 101 खेळाडु उपस्थित होते.पारीतोषिकप्राप्त खेळाडुंना रोख बक्षिसे,ट्राॅफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.या विदयार्थ्यांना मुक्ताई अॅकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे आणि अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
