देवगड ता.१५-:उन्हाळी हंगामात आलेल्या चाकरमानी मुंबईकर यांच्या परतीच्या प्रवासा करीता देवगड आगार सज्ज झाले असून परतीच्या प्रवासाकरीता मुंबई,बोरिवली,या बरोबरच अक्कलकोट बेळगाव या मार्गावर जादा प्रवासी फेऱ्या नियोजन करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली.या जादा गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन व आरक्षण खिडकीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्या बरोबर ग्रुप बुकिंग सुविधा, प्रासंगिक करार तत्वावर देखील एस टी गाड्या देण्यात येत आहेत.त्याचा फायदाही प्रवासी जनतेने घ्यावा. असे आवाहनही श्री सैतवडेकर यांनी केले आहे..
परतीच्या प्रवासाकरिता दि .१३ मे पासून साय.४.४५वा. देवगड बोरिवली,साय.५.००वा. देवगड बोरीवली,दि.१८ मे पासून देवगड मुंबई सेंट्रल,दु.३.३० वा. सोडण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दि.१६ मे पासून देवगड बेळगाव (जादा)प्रवासी फेरी ,पहाटे (सकाळी)५.३० वा.देवगड हुन सुटणार आहे व परतीच्या प्रवासाला दु.१.३० वा. बेळगाव हुन निघणार आहे.
देवगड अक्कलकोट स.९.१५ वा. देवगड येथून निघणार असून परतीच्या प्रवासाला अक्कलकोट येथून स.९.३० वा.निघणार आहे. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रवासी वर्गाला अधिकाधिक सेवा देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार प्रवासी मागणी नुसार जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याचेही आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी सांगितले.
