अन्यथा समुद्रात कुटुंबासोबत बसून आमरण उपोषण करणार…

“त्या” नौका मालकांचा सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्तला इशारा…

देवगड ता.१५-: देवगड तौक्ते चक्रीवादळ होऊन १६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून यांचं दिवशी देवगड बंदरातील तीन नौका फुटून पूर्णतः नष्ट झाल्या .या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही आद्यप पर्यंत शासनाकडून अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नाही त्या बाबत योग्य तो न्याय ,नुकसान भरपाई दि.१६ मे २०२२ पर्यंत मिळावी.अन्यथा दि.१७ मे समुद्रात बसून कुटुंबियांसमवेत आमरण उपोषण करणार असल्याचे देवगड मधील सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर , नौका मालक,पांडुरंग विनायक कोयंडे, अक्षता नीरज कोयंडे, रघुनाथ यशवंत कोयंडे, यांनी सहा .मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग मालवण याना दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते,व तिन्ही नौका मालक यांना ३० एप्रिल २२ रोजी मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत यापूर्वी पत्र देऊन उपोषणाचा मार्ग न स्वीकारणे असे कळविले होते.त्या पत्राला मान देऊन दि १६ मे पर्यंत उपोषण स्थगित केले असल्याचे नमूद करून दि १७ मे रोजी समुद्रात उतरून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You cannot copy content of this page