भरतेश्र्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…

मालवण (प्रतिनिधी) मसुरे येथील श्री भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास काल भव्य कलश शोभायात्रेने प्रारंभ झाल्यानंतर आज भरतेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शवली. दि. १३ मे रोजी कलशारोहणचा मुख्य समारंभ होणार आहे. कोकणातील सर्वांत मोठी गावरहाटी कसबा मसुरे गावचे ग्रामदेवत तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवार दि. १० ते दि. १५ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त काल सायंकाळी भव्य कलश शोभायात्रा काढून या सोहळ्यास प्रारंभ झाला. ही शोभायात्रा लक्षवेधी अशी ठरली.

या सोहळ्यानिमित्त आज बुधवारी दिवसभरात अग्रपूजा, गावगाऱ्हाणे, प्रायश्चित, देवता वंदन, संभारदान, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, स्थलशुद्धी, देवता स्थापना, संप्रेक्षण विधी, पूजा आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर महाआरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर सायंकाळी सुश्राव्य भजने, पालखी सोहळा, महाआरती, रात्री महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या सोहळ्यानिमित्त उद्या दि. १२ मे रोजी ७.३० ते दुपारी १.३० यावेळेत शांतीपाठ, स्थलशुद्धी, स्थापितदेवता पूजन, शतकलश स्थापना, शतकलश स्नान, अग्नीस्थापना, ग्रहस्थापना, प्रसादवास्त न्हवन, ग्रहयज्ञ, शिखर कलश हवन, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी सुश्राव्य भजने, पालखी सोहळा, महाआरती, रात्री महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १३ मे रोजी ७.३० ते दुपारी १.३० या वेळेत शांतीपाठ, स्थलशुद्धी, स्थापितदेवता पूजन, मुख्य देवता हवन, शिखर कलश स्थापना, शतकलश स्नान, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्य दीप पूजन, महाआरती, आशीर्वाद, महाप्रसाद, सायंकाळी सुश्राव्य भजने, पालखी सोहळा, महाआरती, रात्री महाप्रसाद, ९.१५ वाजता श्री देव भरतेश्वर नाट्य मंडळ मसुरे देऊळवाडा मुंबई यांचे यशवंत मानखे लिखित ‘माझे देवा’ हे नाटक सादर होणार आहे. तर १४ मी रोजी रात्री ९ वा. श्री देव भरतेश्वर नाट्य मंडळ यांचे बाळ कोल्हटकर लिखित दुरितांचे तिमिर जावो हे नाटक सादर होणार आहे. तरी भाविकांनी सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page