मालवणात रुबाब क्लॉथ शॉपचे दिमाखात उद्घाटन

मालवण ता.११-:* चौक येथील युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी मालवण येथे सनी (भैय्या) जाधव यांच्या ‘रुबाब’ दि परफेक्ट मेन्स शॉप या कपड्यांच्या ब्रँडचे दालन सुरू केले असून त्यांच्या या ‘रुबाब क्लॉथ शॉप’चे उद्घाटन त्यांच्या मातोश्री प्रणाली गावडे यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या दिमाखात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज सायंकाळी करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून प्रीतम गावडे यांच्या उद्योजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रीतम गावडे यांनी रुबाब या ब्रँडचा क्लॉथ शॉप मालवण एसटी स्टँड समोरील प्राईड स्केवर कॉम्प्लेक्स मधील शॉप क्रमांक ५ मध्ये सुरू केले आहे. या शॉप मध्ये पुरुषांचा रुबाब वाढविणारे जीन्स, फूटविअर, शर्ट, टी- शर्ट आदी विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या शॉपचे उद्घाटन आज करण्यात आले.

यावेळी प्रीतम गावडे यांच्यासह त्यांच्या मातोश्री प्रणाली गावडे, आजी सुलोचना गावडे, बहीण प्रतीक्षा गावडे, काका विनायक गावडे, समीर पाटकर यांसह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नांदेरुख सरपंच दिनेश चव्हाण, प्रसाद आडवणकर, संमेश परब, मनोज मोंडकर, दिलीप बिरमोळे आदी व इतर उपस्थित होते. यावेळी महेश कांदळगावकर, हरी खोबरेकर, मनोज मोंडकर यांच्यासह मालवण व चौके गावातील व्यापारी, उद्योजक, हितचिंतक यांनी प्रीतम गावडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रीतम गावडे यांच्या मातोश्री प्रणाली गावडे यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी प्रीतम गावडे यांच्याहस्ते महेश कांदळगावकर, हरी खोबरेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले.

You cannot copy content of this page