युवराज लखमराजे यांनी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांची घेतली सदिच्छा भेट…

शहरातील विविध विकास कामांसोबत, समस्यांवर केली चर्चा

सावंतवाडी ता.१२-“भाजपचे युवा नेते तथा सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी सावंतवाडीतील विविध विकासात्मक कामांवर त्यांच्याशी चर्चा केली असून, सावंतवाडीतील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर देखील सुमारे दीड ते दोन तास चर्चा केली आहे. यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, गोविंद प्रभू, अँड सुशील रांजगे, अँड राहुल मडगांवकर, अँड रश्मी नाईक, अँड तेंडोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page