आडारी महापुरुष मंदिराचा १३ मे रोजी वर्धापनदिन

*⚡मालवण ता.११-:* मालवण आडारीवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिराचा १७ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १३ मे रोजी साजरा होत आहे. या निमित्त मंदिरात सकाळी श्री देव महापुरुषाची विधिवत पूजा, सकाळी १० वा. सत्यनारायण पूजा, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुश्राव्य भजने, रात्री दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page