आंबोली, ता.११-:* कुंभवडे येथील श्री देव खंडेश्वर ची मूर्ती मिरवणुकीने आणण्यात आली.याठिकाणी आजपासून तीन दिवस ग्रामदैवत आणि सर्व देवदेवतांचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.१३ तरिखला शुक्रवारी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.या नंतर नारळ,ओठी ठेवणे वैगेरे कार्यक्रम सुरू होणार आहेत.आज याठिकाणी पुरोहितांच्या उपस्थितीत शीमधडे आणि गावकरी ग्रामस्थ आणि पै पाहुण्यांच्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी कार्यक्रम सुरू करण्यात आले.भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामदैवत आणि सर्व देवदेवतांचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा १३ मे ला होणार…
