बांदिवडे ग्रामपंचायत कर्मचारी महेश हडकर यांचा प्रामाणिकपणा

*⚡मालवण ता.११-:* बांदिवडे येथे रस्त्यात सापडलेला मोबाइल मूळ मालकाला परत करत बांदिवडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी महेश दत्ताराम हडकर याना मळावाडी तरी नजीक रस्त्यावर अँड्रॉईड मोबाइल पडलेला आढळून आला. मोबाइल ला पॅटर्न लॉक असल्याने महेश याने  प्रवीण चौकेकर यांच्या मदतीने मोबाइल मालकाचा शोध घेतला.

बांदिवडे येथील आरोग्य सेवक राहुल काळे यांचा सदर मोबाइल असल्याचे कळल्यानंतर राहुल यांच्या हाती महेश हडकर यांनी तो मोबाइल सुपूर्द केला. ग्रामपंचायत कर्मचारी महेश हडकर यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे. आरोग्य सेवक राहुल काळे यांनी हडकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page