वडाचापाट येथे जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

*⚡मालवण ता.११-:* भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट व सिद्धार्थ मंडळ वडाचापाट बौद्धवाडी यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त १६ मे रोजी रात्री ९ वाजता समाजमंदिर वडाचापाट येथे जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत ६ वर्षावरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना अनुक्रमे रुपये ५ हजार, ३ हजार, २ हजार व आकर्षक चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. नावनोंदणी साठी सचिन कासले (9421573782), संग्राम कासले (9420824874) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page