कोरोना काळातील सेवेबद्दल मसुरेत डॉक्टरांचा सत्कार

मालवण ता.११-:* सामाजिक देणे म्हणून येथील पेडणेकर बंधू नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉ विश्वास साठे व डॉ अनिता गिरकर यांनी वैधकीय सेवा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना आज आनंद होत आहे. यापुढील काळात सुद्धा सर्वाना वैधकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सर्वच डॉक्टर उपलब्ध असतील असे प्रतिपादन शरद पेडणेकर यांनी येथे केले. मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू यांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. डॉ. विश्वास साठे यांनी सत्काराबद्दल आभार मानले.

यावेळी सर्पमित्र रमण पेडणेकर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मोहन पेडणेकर, दीपक पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, राजन पेडणेकर, समीर पेडणेकर, सुहास पेडणेकर, तुळशीदास पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, गौरव पेडणेकर, परमानंद पेडणेकर, दिनू पेडणेकर, शरद पेडणेकर, यशवंत पेडणेकर, जयवंत पेडणेकर, साईप्रसाद पेडणेकर,रमण पेडणेकर, भूपेश पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, श्रीधर पेडणेकर, किरण पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर,अमेय पेडणेकर, निखील पेडणेकर, पियुष पेडणेकर, सौ.मधुरा पेडणेकर आदी पेडणेकर बंधू उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शरद पेडणेकर यांनी मानले. यावेळी सायंकाळी सत्यनारायण महापूजा, रात्री दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page