मालवण ता.०८-:* मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री विठ्ठल रखुमाई देवालयाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ११ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ८ वाजता नवग्रहशांती होम व मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२.०० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता, स्थानिक भजन संध्याकाळी ७ वाजता ह.भ.प. स्नेहलदिप सामंत बुवा कुडाळ यांचे सुस्वर किर्तन आणि रात्री १०.३० वाजता स्थानिक दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक सादर आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
