मालवण ता.०८-:* विठ्ठल रखुमाई मंदिर तारकर्लीचा २२ वा वर्धापनदिन सोहळा १२ रोजी महापुरुष रंगमंच तारकर्ली याठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
१२ रोजी सकाळी ६ वा. मूर्तीवर दुग्धाभिषेक, सायं. ५ वा. महापुरुष महिला भजन मंडळ तारकर्ली (वरची वाडी) यांचे भजन, सायं. ६ वा. महिला भजन मंडळ तारकर्ली (खालचीवाडी) यांचे भजन, सायं. ७ वा. नित्य महाआरती, सायं. ७.३० वा. झुंजार भजन मंडळ तारकर्ली यांचे संगीत भजन, पहाटे ५ वा. नोट्यझुंजार मंडळ यांची काकड आरती, रात्री ९.३० वा. महापुरुष कलादैवत देवबाग यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग ‘मधुकैतभ’ अर्थात ‘सिद्धटेकचा सिध्दिविनायक’ होणार आहे.
