मालवण ता.०८-:* मालवण तालुक्यातील बिळवस ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दि. ९ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी उद्घाटक व प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेर. या कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अमित आवटी, उपअभियंता सावर्डेकर, बिळवस सरपंच सौ. पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगांवकर, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकाळी ८.३० वाजता गणेश पूजन, सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ, १०.३० वाजता मान्यवरांचे स्वागत, उपस्थितांचा व जमीन मालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम व मनोगत, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद दुपारी ३ वाजता सत्यनारायण पूजा, संध्याकाळी ६ वाजता आरती, तीर्थप्रसाद, ग्रामस्थांचे स्थानिक भजन, सायंकाळी ७ वाजता हळदीकुंकू समारंभ रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्री १०.३० वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक ग्रामपंचायत बिळवस यांनी केले आहे.
