मालवण ता.०८-:* मालवण वायरी लुडबेवाडी येथील आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात वर्धापन सोहळा व गोंधळ उत्सवानिमित्त १० ते १३ मे या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१० रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. सुस्वर संगीत भजन. ११ रोजी सकाळी ९ वा. लघुरूद्र, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, रात्री १० वा. भजनवारी. १२ रोजी दुपारी ४ वा. हळदीकुंकू, रात्री ९ वा. दशावतार नाट्यप्रयोग. १३ रोजी सकाळी १० वा. होमहवन, दुपारी महाप्रसाद, सायं. जोगवा कार्यक्रम, रात्री १०.३० ते पहाटे ५ वा. ‘देवीचा’ गोंधळ’ आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी अध्यक्ष तुळशीदास लुडबे यांनी दिली आहे.
