विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देणार

मंत्री वडेट्टीवार यांची शिष्टमंडळास ग्वाही

मालवण ता.०८-:* विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याप्रकरणी शासनाकडून उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लवकरच ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाचे सुरेश बापर्डेकर यांनी दिली. विशेष मागास प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात, वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आला.

होती. बैठकीस विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे बालाजी चिनके व संतोष सोमा, राजू गाजेंगी, कोष्टी परिषदेचे विष्णू कुटे, बळीराम धुमाळे, मंगेश थरवल (नाशिक), सुदर्शन बोगी (भिवंडी), पद्मशाली समाजाचे सैव रामलु (मुंबई), सुनील देसाई (नाशिक), अरुण खरमाटे, महेश कोठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस वित्त विभाग, सामाजिक न्याय विभाग इतर बहुजन कल्याण विभाग उच्च व तंत्रशिक्षण विभाग संशोधन अधिकारी, राज्य मागास आयोग संचालक, व्हीजेएनटी-ओबीसी-एसबीसी या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच शासन निर्णयाप्रमाणे योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, अशी खात्री वडेट्टीवार यांनी शिष्टमंडळास दिल्याचे बापर्डेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page